बस्तवडे येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी

दर्पण न्यूज कागल प्रतिनिधी ( मारूती कांबळे साके) कांबळे साके ):- बस्तवडे ता. कागल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीस बुद्ध विहार मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रतिमापूजन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार योजना सदस्य सातापा कांबळे यांनी त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक, कृषी विषयी थोडक्यात माहिती दिली व जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी समाजातील लहान बांधवांनी एकत्र मिळून वीहारची स्वच्छता केली तसेच जयंती निमित्त महापुरुषांच्या वरती प्रबोधन गीत सादर करण्यात आले. यावेळी आयुष्यमती प्रियांका कांबळे, कांचन कांबळे, अक्षता कांबळे, प्रियांशी कांबळे, आर्या कांबळे, श्रीनिधी माने, वेदिका कांबळे, समीक्षा माने, तनुजा वायदंडे, श्रावणी शिंदे, आराध्या कांबळे, प्रियांशी कांबळे, दुर्वी कांबळे, संस्कृती कांबळे, क्रांती कांबळे, पार्थ कांबळे, शौर्य कांबळे, रुद्राक्ष कांबळे, आदर्श कांबळे, विजय माने, हर्षवर्धन वायदंडे, रणवीर खोडे, ऋषभ कांबळे, इत्यादी लहान मुले हजर होते. शेवटी आभार आदित्य कांबळे यांनी मानले.