भिलवडी येथे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, जायंट्स सहेली व यंग जायंट्सचा अध्यक्ष व नूतन कार्यकारिणी शपथविधी व पदग्रहण उत्साहात
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी, जायंट्स सहेली व यंग जायंट्सचा 2024 साठीचा अध्यक्ष व नूतन कार्यकारणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा कै. बाबासाहेब चितळे सांस्कृतिक भवन शिवाजीनगर, माळवाडी येथे शनिवार, दिनांक 6 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून द आर्ट ऑफ लिविंग चे डायनामिक डीएसएन टीचर सन्माननीय श्री. सुरेश बेदमुथा साहेब उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जायंट्स वेलफेअर फेडरेशनचे पदाधिकारी उद्योजक श्री गिरीश चितळे, श्री रामदास रेवणकर, श्री सतीश बापट, श्री विलासराव पवार, श्री सुहास खोत, श्रीमती अनुजा पाटील, सौ शीला चौगुले त्याचप्रमाणे भिलवडी जायंट्सचे एनसीएफ मेंबर श्री डॉ. जयकुमार चोपडे, उद्योजक श्री. मकरंद दादा चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मावळते अध्यक्ष श्री सुधीर गुरव यांनी नूतन अध्यक्ष श्री सुबोध वाळवेकर व जायंट्स सहेलीच्या मावळत्या अध्यक्षा सौ. अनिता गुरव यांनी नूतन अध्यक्षा सौ. स्मिता सुबोध वाळवेकर यांच्याकडे पदभार सोपविला. त्याचवेळी यंग जायंट्सच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. अवधूत राजेंद्र कोरे यांच्याकडे सोपवण्यात आली.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री सुरेश बेदमुथा यांनी जीवन जगण्याची कला याबद्दल अत्यंत सोप्या शब्दांमध्ये मोलाचे मार्गदर्शन केले व लवकरच योगा व प्राणायामचे भव्य असे शिबिर घेण्याचे आवाहन केले.
नूतन अध्यक्ष श्री सुबोध वाळवेकर म्हणाले की सर्व जायंट्स मेंबर्सनी आम्हा दाम्पत्यावर ज्या विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे त्यास पात्र राहुन सर्व जायन्ट्सच्या सहकार्याने, नव्या उत्साहाने जायंट्स चळवळ आणखी बळकट करून वर्षभर नेत्रदान, रक्तदान, विविध स्पर्धा, आरोग्य शिबिरे अशा उल्लेखनीय उपक्रमांबरोबरच योगासन, प्राणायम, ध्यान या माध्यमातून आनंदी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वेग वेगळे उपक्रम राबवले जाणार असल्याचा मानस व्यक्त केला . यावेळी नूतन अध्यक्षा सौ स्मिता सुबोध वाळवेकर यांनी प्रत्येक जायंट्स मेंबर्सनी आपल्या पत्नीस जायंट्स सहेलीमध्ये सहभागी करावे असे आवाहन केले.
यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
*जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी नूतन कार्यकारिणी* – नुतन अध्यक्ष सुबोध वाळवेकर , उपाध्यक्ष बाळासाहेब महिंद-पाटील , उपाध्यक्ष महावीर चौगुले , कार्यवाह निवास गुरव
सहकार्यवाह श्री. पार्श्वनाथ चौगुले , खजिनदार विशाल सावळवाडे , पी आर ओ- श्री. रोहित रोकडे,
आय.पी.पी. सुधिर गुरव
*सहेली ग्रुपच्या* नुतन अध्यक्षा सौ. स्मिता वाळवेकर , उपाध्यक्षा सौ.उज्वला परीट , उपाध्यक्षा सौ.स्नेहा शेडबाळकर , कार्यवाह सौ.अमृताचौगुले , खजिनदार सौ.चैत्राली कुलकर्णी , आय.पी.पी. सौ.अनिता गुरव.
*यंग जायंटस्* चे नुतन अध्यक्ष अवधूत कोरे , उपाध्यक्ष हृतिक पाटील , उपाध्यक्ष योगेश वाळवेकर , कार्यवाह प्रथमेश परीट , खजिनदार संस्कार पाटील , सहकार्यवाह वरद चौगुले या सर्व नुतन सदस्यांना सुहास खोत यांनी शपथ दिली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पाटील सर यांनी केले व आभार महावीर चौगुले यांनी मानले.