सर्वांगिण विकास करणार ; प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून द्या : कार्यसम्राट भाजपाचे उमेदवार योगेंद्र थोरात

दर्पण न्यूज मिरज/ सांगली (अभिजीत रांजणे):-
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये मी बहुसंख्येने विकासकामे केली आहेत. येणाऱ्या काळात ही प्रभाग क्रमांक 20 कायापालट करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे मला बहुसंख्येने मतदान करा, असे आवाहन भाजपचे उमेदवार कार्यसम्राट योगेंद्र थोरात यांनी केले आहे.भाजपाचे उमेदवार कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक 20 मध्ये बौद्ध विहार, मराठी शाळा याचं आदर्श उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. या प्रभागातील माता भगिनींना आरोग्य सुविधा दिल्या आहेत. सामान्य माणसाची कामे आपण तळमळीने केली आहेत. यापुढे आपण कामे करणार आहे. त्यामुळे कुणाच्या आश्वासनांना बळी पडू नका. येणाऱ्या 15 जानेवारीला मतदान करावे असे आवाहन भाजपचे उमेदवार कार्यसम्राट योगेंद्र थोरात यांनी केले आहे.



