भिलवडी येथे माजी मंत्री कै डॉ पतंगराव कदम साहेबांना अभिवादन अन् विश्वजीत दादांचं अभिवचन…!

माझं विश्वजीत कदम यांच्यावर मनापासून प्रेम आहे याची अनेक कारणं आहेत..त्यापैकी एक म्हणजे साहेबांसारखी गरजूंना मदत करण्याची दानत..मग तो कुठल्या जाती-धर्म पक्षाचा असो..
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील विहंग आकाश मोरे..
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याला डायबिटीसचा त्रास सुरु झालाय.त्याची शुगर साधारण 400 ते 500 असते. मधुमेहतज्ञ डॉ.अनिकेत कुंभोजकर यांच्याकडे त्याचे उपचार सध्या सुरू आहेत.गेली तीन वर्षे झाली..त्याला रोज सुमारे पाच इंजेक्शन द्यावे लागतात.
शुगर मात्र अजून 430+ आहेच..
यामुळे त्याच्या अन्ननलिकेला,लिव्हरला आता त्रास होतोय.इन्सुलिन पंप हा एक पर्याय डॉक्टरांनी सुचवलाय..जो शुगर मेंटेन करण्याचं काम करतो.
या इन्सुलिन पंपची किंमत 2 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.काल विश्वजीत दादांचा चोपडेवाडी-भिलवडी दौरा होता. भिलवडीत साहेबांना अभिवादन करण्यासाठी ते थांबले होते.विहंगची माहिती सांगताच क्षणार्धात इन्सुलिन पंप देण्याचं त्यांनी अभिवचन दिलं.लगेचच त्यांनी कागदपत्रेही मागवली.
विश्वजीतदादांची ज्या आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो ते खऱ्या अर्थाने सार्थक झालं.देतो..करतो..थांबा..सांगतो..पुढच्या वेळेला भेटू असं काही नाही..
मुलगा लहान आहे.. त्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे म्हटल्यावर ज्या गतीने त्यांनी हा निर्णय घेतला त्याला आमचा सलाम आहे.
अशी दानत..असा नेता आम्हांला लाभला याचा रास्त अभिमान आहे.*विश्वजीतदादांचा विजय असो..*
🫡❤️दीपक पाटील,
भिलवडी
या कामासाठी भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही धन्यवाद.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम साहेबभिलवडी येथे आम्ही आपणास विनंती केल्या केल्या आपण मोलाची मदत केली. यावेळी आम्हा सर्वांना डॉ पतंगराव कदम साहेब यांची आठवण झाली.
ही केलेली मदत कदापि आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. पुन्हा एकदा बाळासाहेब धन्यवाद..!🙏🏻आपलाच
पत्रकार अभिजीत रांजणे
————————————————————