महाराष्ट्र
मिरज येथे उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्याकडून उपसरपंचपदी निवडीबद्दल एरंडोलीचे सचिन पोतदार यांचा सत्कार

मिरज : सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील एरंडोली येथील सचिन प्रभाकर पोतदार यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सर्वानुमते निवड झाली. या उपसरपंचपदी निवडीबद्दल मिरज येथील अथर्व मल्टिपल अर्बन इंडिया निधी बँकच्या प्रधान कार्यालयात मा उद्योगपती सी.आर. सांगलीकर साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन पोतदार यांचा सत्कार केला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एरंडोलीचे माजी उपसरपंच आत्माराम जाधव, किरण पाटील उपस्थित होते. नेहमीच उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा सत्कार करतात. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात. यामुळे उद्योगपती सी आर सांगलीकर यांचे नेहमीच लोक कौतुक करीत असतात.