महाराष्ट्र
सुखवाडी येथील सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा संजय यादव यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सुखवाडी येथील सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा .संजय यादव (59 )सर यांचे हृदयविकाराने निधन झाले.
ते महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळ सांगली जिल्ह्याचे कोषाध्यक्ष,जायंटस् ग्रुप भिलवडी चे संचालक,संजय गांधी निराधार योजना पलूस तालुक्याचे संचालक,नव्याने सुरू होत असलेल्या सन्मान मल्टीस्टेट को ऑप.मिल्क प्रोड्यूसर अँन्ड प्रोसेसर्स लि. सुखवाडी/ भिलवडीचे संस्थापक होते. विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज इस्लामपूर येथील व्यावसायिक शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले होते.सामजिक,शैक्षणिक,सहकार क्षेत्रात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने वेगळा ठसा निर्माण केला.त्यांच्या पश्चात चार भाऊ, पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.रक्षाविसर्जन विधी सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. सुखवाडी येथे होणार आहे.