शाळगाव येथे डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडेगांव : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचारार्थ शाळगाव येथे आयोजित जाहीर सभेस आणि पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, पलूस-कडेगाव मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत विविध विकासकामे केली आहेत. प्रेम, आशीर्वाद आणि खंबीर साथ देणारे कार्यकर्ते हीच माझी खरी ताकद आहे. जनतेच्या विश्वास व पाठिंब्यामुळेच विकासकामांच्या माध्यमातून पलूस-कडेगाव मतदारसंघाचा कायापालट करणे शक्य झाले असून, आगामी काळात आपल्या मतदारसंघाचा गतिमान सर्वांगीण विकास करून पलूस-कडेगावचे नाव देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे माझे ध्येय आहे.मतदारसंघात विकासाची गंगा अखंडित प्रवाहित ठेवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
यावेळी खासदार विशाल दादा पाटील, हरी भाऊ कदम, युवा नेते सतीश आबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामस्थ, माता-भगिनी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले . या सभेस शाळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.