मालगाव जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी मतदारांनो क्रांती घडवा, पुष्पाताई शिंदेना निवडून द्या : गंगाधर तोडकर

दर्पण न्यूज मिरज प्रतिनिधी :-
मालगाव जिल्हा परिषद गटाच्या अपक्ष उमेदवार पुष्पाताई शिंदे यांना कोणी हलक्यात घेऊ नका. मतदाराला आपल्या प्रभागाचा विकास का होत नाही याचा जाब विचारण्याचा अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर आपल्या मालगावच्या ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई शिंदे या अपक्ष उमेदवार यांना निवडून द्या. नव्या पर्वाचा उदय करा असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गंगाधरराव तोडकर यांनी केले आहे.
गंगाधरराव तोडकर प्रसिद्धी माध्यमासमोर बोलताना म्हणाले, मी 40 वर्षे सामाजिक कार्यात सहभागी आहे. पण आज अखेर मी माझी कधीच प्रसिद्धी केली नाही. पण आत्ताच्या निवडणुकीत पैसा जर सर्वश्रेष्ठ ठरत असेल तर उद्रेक होणे स्वाभाविक आहे. पैसा आणि मनगटी ताकद जर आपल्यावर भारी पडत असेल तर आता विचार करण्याची वेळ आली आहे. पैसा आहे तो प्यार, नही तो सब अशा पद्धतीने आपल्या गावचा विकास यापुढे तरी झाला पाहिजे असे वाटत असेल तर पुष्पाताई शिंदे यां अपक्ष उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे.
राजकारणात ज्या महिला सदस्य निवडून येतात. त्यांचे पती अथवा नातेवाईकच कारभाराचे कामकाज पहात असतात. महिला सदस्य स्वाक्षऱ्यांच्या नुसत्या धनी असतात, पण पुष्पाताई शिंदे या ग्रामपंचायतमध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्या कुठल्याच नातेवाईकांचा कधी हस्तक्षेप दिसला नाही. अपक्ष उमेदवार पुष्पाताई शिंदे या एक उच्चशिक्षित वकील आहेत, त्या स्वतः सक्षम उमेदवार आहेत. सत्ता कुणाचीही असो, विकास कामासाठी जो निधी यायचा असतो, तो येतच असतो. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या जशा मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे आपल्या शहर, प्रभागाच्या ही मूलभूत समस्या आहेत. रस्ते, वीज, पाणी यासारख्या समस्या अजूनही सुटल्या नाही. सद्यस्थितीत गलिच्छ राजकारणाचा उन्माद सुरू आहे. निवडून येणारे लुटमारीचाच व्यवसाय करत आहे. कुठलीच योजना जनतेसाठी नाही. कोट्यावधीची विकास कामे आपल्या भागात करण्यात आली असे सांगितले जाते पण विकास कुठे दिसत नाही. मंदिराचा विकास म्हणजे शहर, जिल्हा, ग्रामीण भागाचा विकास म्हणायचा का? कुठे? किती? रुपये कोणत्या कामासाठी खर्च केले याचा अहवाल एकदा जनतेसमोर आला पाहिजे. आजपर्यंत आपल्या मतदार जनतेला गुलाम कसे बनवायचे याची सगळ्यांनी ती आखलेली दिसून येते. कोणाचं कोणाला काही कळू नये अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली जात आहे. गटातटाच्या राजकारणात तरुण पिढीला बाद केले जात आहे. तिच्या मार्गावर चाललेल्या राजकारणावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. सत्तेची नशा घातक ठरू लागली आहे. सुडाच्या राजकारणात आपल्या गावची गळ्चेपी झाली आहे. कुठलीच गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित नाही.
तात्पुरत्या गरजेसाठी कुठपर्यंत नतमस्तक व्हायचं. वर्षांवर्षी निवडून येणाऱ्यांनी आपल्या गावच्या विकासासाठी आतापर्यंत किती निधी आणला कोणकोणत्या कामावर खर्च केला याची माहिती त्यासंबंधीचा अहवाल कधी जनतेसमोर ठेवण्यात आला नाही. राजकारणातला जो धुमाकूळ सुरू आहे याबाबत मतदारांनी योग्य निर्णयावर आले पाहिजे. नव्या परवाचा उदय केला पाहिजे प्रस्थापितांना आता कुठेतरी थांबविले पाहिजे अडचणी समस्या भरपूर आहेत त्या सोडवण्यासाठी अपक्ष उमेदवार एडवोकेट पुष्पाताई शिंदे या काम करणाऱ्या अपक्ष उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गंगाधर तोडकर यांनी शेवटी केले आहे.





