अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट अॕँड मीडिया प्रा.लि.संस्थेचा राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग : मिरज येथे ८ रोजी”शुद्ध बीजापोटी”

सांगली :- उद्योगपती, माननीय सी.आर.सांगलीकरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सीआरएस ग्रुपमधिल अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट अॕँड मिडीया प्रा.लि.ही संस्था बहुजन कलाकार, साहित्यिक यांना पाठबळ देण्याचं काम करत आहे.संस्थेने महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला आहे.अथर्व एंटरटेनमेंट संस्था कला आणि साहित्य क्षेत्रातील बहुजन कलाकार,साहित्यिकांना घडवण्यासाठी काम करत आहे.ही संस्था पुणे, मुंबई भागात अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे.मैत्रीपूर्ण संवादाचं व्यासपीठ म्हणून ‘मित्रांगण’ हे दर्जेदार त्रैमासिक संस्था अखंडित पणे प्रकाशित करत आहे. हे कार्य मागील नऊ वर्षांपासून चालू आहे. मित्रांगण त्रैमासिकाची पृष्ठमांडणी, रेखाटने,छपाई अतिशय सुंदर आणि आकर्षक,सुबक असते.तसेच त्यातील लेख ही नामवंत लेखक,विचारवंतांसह प्रत्येक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींचे असतात.त्यामुळे ‘मित्रांगण’ हे अल्पावधीतच वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.चोखंदळ वाचक मित्रांगणची आतुरतेने वाट पाहत असतो.मा.सांगलीकर साहेब आपल्या व्यस्त शेड्युलमधुन ही त्रैमासिकाचे संपादकीय कार्य समर्थपणे सांभाळत आहेत.
अथर्व सांगलीकर एंटरटेनमेंट अॕँड मिडीया प्रा.लि.संस्थेने अनेक कलाकार तयार केले असून अनेकांना प्रोत्साहन देत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सांगलीकर साहेबांचे समर्थक कलाकारांनी प्रख्यात लेखक प्रेमानंद गज्वी लिखित चळवळ आणि सामाजिक विषयावरील ‘शुद्ध बीजापोटी’ हे दोन अंकी नाटक बसवले आहे.नाटकाचे निर्माते सांगलीकर साहेब स्वतः आहेत.राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस,कामगार कल्याण मंडळाच्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस तसेच एसटी महामंडळ राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाचे बक्षीस मिळविलेले नंदकुमार कुरुंदवाडकर हे दिग्दर्शन करत आहेत.शैलजा साबळे,वनिता कोरे, विश्वास मागाडे,रोहीणी लोंढे, हर्षवर्धन काळे,आकाश शिंदे,दिपक गोठणेकर, अविनाश जाधव, नंदकुमार कुरुंदवाडकर हे गुणी कलाकार काम करत आहेत.तंत्रज्ञ म्हणून कासीम मुलाणी,सुरज कांबळे, योगेश साबळे, प्रियांका कांबळे, चेतना नागवंशी, दिपक कांबळे,हे आपापली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत आहेत. नाटकाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्व कलाकार मागील दीड महिन्यापासून सांगलीकर फौंडेशन बालाजीनगर सांगली येथे सातत्याने रोज कसून सराव करत आहेत.सर्व कलाकारांना मा.सांगलीकर साहेब मार्गदर्शन व प्रोत्साहन देत आहेत. जिल्ह्यातील बहुजन कलाकारांना मा. सांगलीकर साहेबांनी अथर्व एंटरटेनमेंट अॕँड मिडीया या संस्थेच्या माध्यमातून एक चांगले आणि भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.भविष्यात बहुजन कलाकारांनी याचा लाभ घ्यावा.