आरोग्य व शिक्षण

भिलवडी इंग्लिश स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण : लीना चितळे

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम वार्षिक क्रीडा स्पर्धां पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

भिलवडी : ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागाबरोबर स्पर्धेला उतरतील असे शिक्षण भिलवडी इंग्लिश स्कूलमध्ये दर्जेदार मिळत आहे, असे मत लीना चितळे यांनी व्यक्त केले.

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियमच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात सौ चितळे बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून   क्षीतिज पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप माने उपस्थित होते. यावेळी विभाग प्रमुख के डी पाटील, मुख्याध्यापिका सौ स्मिता माने उपस्थित होते
भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.शाळेचे विभाग प्रमुख . के. डी. पाटील सर व शाळेच्या मुख्याध्यापिका.स्मिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक क्रीडा स्पर्धेमधील विविध खेळांचे संयोजन केले. खेळाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने व जेष्ठ लिपीक सौ.संजीवनी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले .
वार्षिक क्रीडा महोत्सवात धावणे, तीन चाकी सायकल चालवणे, लंगडी, विठ्ठल उडी, बेडूक उडी, पुस्तक डोक्यावर ठेवून समतोल राखणे, चेंडू चा समतोल राखणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे क्षीतिज पतसंस्थेचे चेअरमन . प्रदीप माने होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्थेचे सहसचिव व इंग्लिश मीडियम व प्रायमरी ॲड हायस्कूल चे विभाग प्रमुख श्री. के. डी . पाटील अध्यक्षीय भाषणात अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांचे महत्त्व मुलांना समजून सांगितले.
या कार्यक्रमासाठी.
लीना वहिनी चितळे, मुख्याध्यापिका. स्मिता माने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!