सांगली विश्रामबाग चौक ते नूतन पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग झोन जाहीरनामा प्रसिध्द

सांगली : विश्रामबाग चौक ते नुतन पोलीस अधीक्षक कार्यालय जाणाऱ्या दक्षिणोत्तर रोडच्या पुर्वेकडील बाजूस करण्यात आलेल्या नो पार्किंग झोनबाबत दिलेल्या हरकतींचा व वाहनांच्या पार्किंग सुविधांचा असलेला अभाव विचारात घेता नो पार्कीग झोनमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून वाहनधारकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांच्या हरकती विचारात घेऊन “नो पार्किंग झोन” करण्याबाबतचा प्रायोगिक तत्वावरील जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. नागरीक, रहिवाशी, वाहनधारक यांनी वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. हरकती, सूचना पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा सांगली यांच्याकडे लेखी स्वरुपात पाठवाव्यात, जेणेकरुन प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन करून वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केले आहे.
या जाहिरनाम्यानुसार पुढीलप्रमाणे नो पार्किंग झोन व पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
नो पार्किंग झोन मार्ग / ठिकाण
विश्रामबाग चौक ते कुपवाड रोड जाणारे ओव्हरबीजचे लगत पर्यंत दक्षिण – उत्तर जाणाऱ्या रस्त्याचे पश्चिमेकडील बाजूस सर्व वाहनांना (नुतन पोलीस अधीक्षक कार्यालय कंपाऊंड लगतच्या बाजूस) नो पार्किंग / वाहने उभी करणेस मनाई करण्यात आली आहे. (शहरी बस थांब्याजवळ शहरी बसेस व दुचाकी वाहनांसाठी वगळून) – सर्व वाहनांसाठी.
पर्यायी पार्किंग व्यवस्था
नुतन पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरीकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था जुने पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली कार्यालयाचे पुर्वेकडील मोकळ्या जागेत व पोलीस पेट्रोल पंपाचे पाठीमागे करण्यात आली आहे. नुतन इमारतीमध्ये देखील पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच नुतन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दक्षिणेकडील बाजुस रिकाम्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त इतर नागरीकांना/वाहनधारकांना
१) चार चाकी वाहने विश्रामबाग चौकाचे पुर्वेकडील बाजूस असले दांडेकर मॉलचे उत्तर बाजूस सध्या ट्रक पार्किंग होत असलेल्या मोकळ्या जागेत ( बस स्टॉपच्या पाठीमागे) वाहने पार्किंग करता येतील.
२) विश्रामबाग चौक ते नविन ओव्हर ब्रिज दक्षिणोत्तर जाणारे रस्त्याचे पुर्वेकडील बाजूस मारुती टी स्टॉल कॉर्नर ते प्रेरणा कॉम्प्लेक्स कॉर्नर पर्यत रस्त्याचे कडेला ट्रेंग्युलर पार्किंग करता येतील.
३) चार चाकी वाहनधारकांसाठी नुतन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे समोरुन सुरु होणारा नविन ओव्हर ब्रिजचे बाजूस पश्चिमेकडील असलेल्या (विश्रामबाग रेल्वे फाटकाकडे जाणारा/ वाहतूक शाखा सांगली कार्यालयाकडील सर्व्हिस रोडचे बाजूस वाहतूक शाखा सांगली कार्यालयाचे प्रवेशद्वारापर्यंत वाहने पार्किंग करता येतील.
४) विश्रामबाग चौकात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांसाठी विश्रामबाग चौक ते मिरज जाणारे रोडवर रस्त्याचे उत्तर बाजूस विश्रामबाग ICICI बँकेच्या समोर ते आलदर चौक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयापर्यंत रस्त्याचे उत्तर बाजूस चार चाकी वाहनांना ट्रेंग्युलर पार्किंग करता येईल.
वरील ठिकाणी नो पार्किंग संदर्भात दिलेल्या हरकतींचा विचार करता फक्त विश्रामबाग चौकात, क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा व उद्यानामध्ये येणाऱ्या चार चाकी वाहनांसाठी दांडेकर मॉलचे उत्तरेकडील बाजूसच फक्त पार्किंगची सुविधा केली होती. तद्नंतर विश्रामबाग चौकामध्ये कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना त्यांची वाहने पार्किंग करणेकरीता एकुण 4 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
हा जाहीरनामा नागरिकांनी दिलेल्या हरकती विचारात घेऊन विश्रामबाग चौक हा मुख्य रहदारीचा चौक असल्याने होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाइ दि. 1 ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत 30 दिवसांकरीता प्रायोगिक तत्वावर पुन्हा राबविण्यात येत असल्याचे जाहिरनाम्यात म्हटले आहे.