कृषी व व्यापारमहाराष्ट्र

कवठेमहांकाळ येथे अटल भूजल योजनेंतर्गत  तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न

            सांगली : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.  या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक तथा तालुकास्तरीस समन्वय समिती अटल भूजल योजना सदस्य सचिव संतोष पाटील, कृषी तज्ज्ञ नागनाथ पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे, अभिजीत शिंगाडे उपस्थित होते.

             यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृध्द ग्राम स्पर्धेबाबत  माहिती दिली. तसेच यावर्षी तालुक्यात पाऊस खुप कमी झाला असल्याने अधिकारी व ग्रामपंचातस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी अटल भूजल योजना गावस्तरावर प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

कनिष्ठ भुवैज्ञानिक संतोष पाटील यांनी अटल भूजल योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावनी याबाबत माहिती दिली. तसेच भूजलाच्या अनियंत्रीत उपश्यामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. योजना पूर्णतः केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत असून या  प्रकल्पाअंतर्गत  कवठेमहांकाळ तालुक्यातील 44 गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळ्या विभागाच्या जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबाधित राखणे. मागणी आधारीत (पाणी बचतीचे उपाय योजना) व पुरवठा आधारीत (जलसंधारण व भुजल पुनर्भरण) व्यवस्थापनाच्या सुत्राचा अवलंब करुन भुजल साठ्यात शाश्वता आणणे. सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना मनरेगा,

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादीच्या माध्यमातून होत असलेल्या गुंतवणुकीमध्ये एककेंद्रभिमुखता साध्य करणे. जलसंपदा विभाग, कृषि विभाग, भूजल पुनर्भरण, रोजगार हमी योजना, विहिर पुनर्भरण, बंधारे शोषखड्डे यांची कामे प्राधान्याने राबविणे, भुजलाच्या शाश्वत विकासाकरिता जिल्हा व ग्रामपातळीवर सक्षम संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे. सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करुन उपलब्ध पाण्याचा वापर मर्यादित करणे. सिंचन व्यवस्थापनामध्ये सुधारणा आणणे व सर्व बागायती क्षेत्रात 100 टक्के ठिबक व तुषार सिंचनाखाली आणणे. आदी विषयाची माहिती देवून जल सुरक्षा आराखडा व पाण्याचा ताळेबंद जल सुरक्षा आराखडा Atal Jal MIs याबाबात सविस्तर माहिती श्री. संतोष पाटील यांनी दिली.

कृषी तज्ज्ञ नागनाथ पाटील यांनी अटल भूजल योजनेंतर्गत गावस्तरावर आयोजित करण्यात आलेले शेतकरी मेळावे व तृणधान्य लागवड कार्याशाळेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उपस्थित राहून ठिबक व तुषार सिंचनचा लाभ मिळण्याकरीता नोंदणी करण्याबाबत माहिती दिली. तसेच सूक्ष्म सिंचन शेती पद्धत, पाणलोट विकास पद्धती, उपचार पद्धती, पाण्याचा ताळेबंद, एक पद्धत लागवड व महाडीबीटी ऑनलाईन प्रणाली वरील अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे यांनी भूजल समृध्द ग्राम स्पर्धा 2023-24 बाबत मुल्यंमापन व पडताळणी बाबत सविस्तर माहिती दिली.

तालुकास्तरीय प्रशिक्षणास योजनेत समाविष्ठ तालुक्यातील 44 गावांचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्था समन्वयक कु. कविता सर्वदे व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!