महाराष्ट्र

डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ पूर्णाकृती पुतळा, स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते तथा उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी

मिरज मतदारसंघातून हजारो लोक घेऊन जाणार : महिलांचा मोठा सहभाग असणार

मिरज :

कडेगांव येथे राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ पूर्णाकृती पुतळा व स्मारक लोकार्पण सोहळा ५ सप्टेंबर २०१४ रोजी कडेगाव (जि. सांगली) येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते,  उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज मतदार संघातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली. जास्तीत जास्त लोक येऊन जाण्याचा सी आर सांगलीकर यांचा मानस आहे.

या सोहळ्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा होत आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार, तेलंगणा मुख्यमंत्री रवंथ रेड्डी आदीसह देशातील, राज्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत मिरज विधानसभा क्षेत्रातील गावोगावी कॉँग्रेस विचाराचे कार्यकर्ते, गावनिहाय प्रमुख पदाधिकारी यांची भेट घेत निमंत्रण दिले. यावेळीजिल्हा बॅँकेचे संचालक सिकंदर जमादार, जिल्हा कॉँग्रेसचे खजिनदार सुभाषतात्या खोत, कॉँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सदाभाऊ खाडे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील, धनराज सातपुते, योगेश पाटील आदीसह विविध संस्थांचे माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधत लोकतीर्थ लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत आवाहन केले.

नेहमीच काँग्रेसच्या कामासाठी वाहून घेणारे काँग्रेसचे नेते तथा उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी कडेगाव येथील कार्यक्रमासाठी मोठी आखणी केली आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा वाढेल याकडे सी आर सांगलीकर यांचे कटाक्षाने लक्ष आहे. या  सोहळ्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन ही सांगलीकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!