महाराष्ट्रराजकीय
मुंबई येथे स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

दर्पण न्यूज मुंबई, : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी मंत्री महोदय व दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.