पलूस शहरात रमेश टेक्स्टाईल मध्ये खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी
पलूस :
पलूस शहरात पलूस पोलीस ठाणे जवळ मेन रोडला रमेश टेक्स्टाईल या नावाने साधना बनकर माळी यांनी नवीन कापड दुकानाचे भव्य दालन सुरू केले आहे. दिवाळीनिमित्त रमेश टेक्स्टाईल या नवीन दालनामध्ये ग्राहकांची कपडे खरेदी करिता मोठी झुंबड उडाली आहे .पलूस आणि पलूस पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना एकाच छताखाली, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतचे सर्व स्त्री ,पुरुष, लहान मुले, मुली यांचे करिता लागणारे सुटिंग शर्टींग ,मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर कॉस्मेटिक आणि रेडिमेड कपडे, कटपीस, साड्यांचे वेगवेगळे प्रकार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे काम रमेश टेक्स्टाईल यांनी केले आहे. नव्याने सुरू झालेल्या या दालना मध्ये ग्राहक बंधू भगिनी यांनी खरेदीचा आनंद घेतला. साधना बनकर माळी म्हणाल्या, दिपावली करिता आम्ही ग्राहकांना उपयुक्त अशा सर्व कपड्यांच्या व्हरायटी उपलब्ध करून दिल्या आहेत ,एक वेळ आमच्या रमेश टेक्स्टाईल ला भेट देऊन आपण आपली खरेदी करावी .नागरिकांनीही पलूस शहरांमध्ये नव्याने रमेश टेक्स्टाईल येथे कपडे खरेदी करिता चांगले ठिकाण उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले.