भिलवडी येथे श्रींची मूर्ती घरी विसर्जन केलेल्या गणेश भक्तांना पुस्तक भेट

भिलवडी – पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने या ही वर्षी गणेश मूर्ती घरीच विसर्जन करा आणि सुंदर पुस्तक भेट मिळवा हा उपक्रम भिल्व्डीत संपन्न झाला या उपक्रमात ५५ हून अधिक गणेश भक्तांनी गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करून आपला सहभाग नोंदवला यामध्ये भिलवडी,अंकलखोप ,धनगाव ,विटा ,आटपाडी.सांगली यांचा समावेश होता
नुकताच भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या सभाग्रहात या सर्व भक्तांचा स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभोध वाळवेकर ,दक्षिण भाग सोसायटीचे संचालक संजय पाटील सर यांची विशेष उपस्थिती होती केंद्र प्रमुख सुभाष कवडे सर यांनी सर्वांचे स्वागत करून या उपक्रमाचा आढावा घेतला श्री.कवडे म्हणाले गेली तीन वर्षे हा उपक्रम सुरु आहे प्रत्येक वर्षी प्रतिसाद वाढतो आहे नदीला जाणुया नदीला जपूया हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उप्रकम सुरु केला आहे घरीच मूर्ती विसर्जन करून पाणी रोपांना द्यावे व आपल्या लाडक्या बाप्पाचे दररोज दर्शन घ्यावे हा हेतू आहे पर्यावरण रक्षण व वाचन संस्कार या दुहेरी हेतूने हा उपक्रम सुरु आहे आज जे गणेश भक्त उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या घरी जाऊन पुस्तके भेटी दिली जाणार आहेत यावेळी झालेल्या चर्चा सत्रात सुभोध वाळवेकर संजय पाटील सर ,गौरवी सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला संस्कार केंद्राचे स्वयंसेवक बाळासाहेब माने यांनी आभार मानले पुढील वर्षी सुद्धा हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याचा संकल्प गणेश भक्तानी केला दरम्याण याही वर्षी संस्कार केंद्राचे वतीने दोन ट्रोली निर्माल्य संकलित करण्यात आल्याची माहिती श्री.सुभाष कवडे यांनी दिली