पलूस जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पीएम श्री विज्ञान ज्योती सी-स्टेममध्ये राष्ट्रीय स्तरावर मिळवले यश

पलूस :-पी एम श्री स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय पलूस सांगलीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान ज्योती सी-स्टेममध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय पलूस, जिल्हा सांगली. हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या विज्ञान ज्योती कार्यक्रमाचा एक भाग आहे. त्याला आय बी एम व ए आय एफ आणि नवोदय विद्यालय समिती मदत करत आहेत. ज्याद्वारे मुलींना उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्यासाठी,विज्ञान ज्योतीमध्ये भाग घेतला जातो.
या कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील मुलींना प्रत्येकी 1000 रु ची मासिक शिष्यवृत्ती,ज्ञान,भागीदारांची संघटना, औद्योगिक भेटी, शास्त्रज्ञांशी संवाद आणि आंतरराज्यातील रोल मॉडेल तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी चांगले संसाधन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. सी-स्टेममध्ये नवोदय च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिबीर व प्रश्नमंजुषामध्ये भाग घेतला. त्यामध्ये वृषाली गोरे, स्वरा पाटील, प्रतीक्षा चव्हाण, काजल चव्हाण, स्नेहा पाटील, अनुष्का पाटील, भूमिका गवळी आणि प्रांजली शिंदे यांनी देशातील 260 जवाहर नवोदय विद्यालयात, राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान पटकावले आहे, या यशाबद्दल प्राचार्य सुनीलकुमार नल्लाथ यांनी मार्गदर्शन केले व पारितोषिक वितरण केले. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम मुलीना भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करतात असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समन्वयक गोपाल चोपडे यांनी या कार्यक्रमाचे दरमहा आयोजन करून नववी ते बारावी च्या विद्यार्थिनी ना मार्गदर्शन करतात. या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व कर्मचारी, विद्यार्थी व पालकांकडून सर्व विद्यार्थिनीचे, प्राचार्यांचे व कार्यक्रमाचे समन्वयक गोपाल चोपडे यांनी कौतुक व अभिनंदन केले.