ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भिलवडी- माळवाडी येथील आर के कंट्रक्शन माळवाडी यांच्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आर के कंट्रक्शन चे संस्थापक राज साहेब चौधरी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी मा ळवाडी येथील आर के कंट्रक्शन माळवाडी यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर यामध्ये माळवाडी भिलवडी चोपडेवाडी आसपासच्या गावांमधील कामगार ज्येष्ठ व लहान मुलांनी सुद्धा सहभाग दाखवला यामध्ये 213 लोकांचे मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी करण्यात आली.

लगेच त्यावर उपचार म्हणून गोळ्याही देण्यात आल्या यामध्ये एचपी ब्लडप्रेशर रक्तातील साखर ईसीजी हेे सर्व टेस्ट मोफत करण्यात आल्या .यासाठी स्पंदन हॉस्पिटल अँड आदित्य डायगोनिक सेंटर आष्टा यांनी डॉक्टरांशी टीम देऊन सहकार्य केले माळवाडीतल्या गावातील डॉक्टरांनीही यामध्ये सहभाग दाखवला .आदित्य हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित कबाडे सर यांनी मोलाचे मार्गदर्शनन केले आर के टीमला या कामाबद्दल शुभेच्छा ही दिल्या. माळवाडीतल्या डॉक्टरांनीही शिबिरामध्ये सहभाग दाखवून अनेकांना मार्गदर्शन केले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आरके कंट्रक्शन माळवाडी त्यांच्या टीमने जे काही उपक्रम राबवत आहे त्यांचे कौतुक होत आहे. आर के कंट्रक्शन चे संस्थापक राज साहेब चौधरी यांचा हा वाढदिवसानिमित्त दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवण्याची संकल्पनेचा आदर्श मानून सर्व कामगारांनी व आर् के टीमने आरोग्य शिबिराला यशस्वी होण्यासाठी साथ दिली.: स्पंदन हॉस्पिटलस्पंदन हॉस्पिटलचे सुजित कबाडे व व त्यांची टीम माळवाडी गावचे चोपडे डॉक्टर, डॉक्टर मदने ,डॉक्टर किणीकर , भिलवडी चे  डॉक्टर ज्येष्ठ कुलकर्णी , माळवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!