आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

भिलवडी येथे खंडेराव पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ; मान्यवरांची उपस्थिती

भिलवडी – भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये ज्येष्ठ शिक्षक खंडेराव पाटील (के. आर पाटील) हे दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या निमित्त संस्थेच्या वतीने भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, चांदीची गणेश मुर्ती, व पोशाख, पुष्पगुच्छ देवून शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक विजय तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, शिक्षक प्रतिनिधी शिवाजी कुकडे, अशोक पाटील, सौ. मनिषा पाटील, सौ. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रूपेश कर्पे , नंदकिशोर कांबळे, कु. धनश्री शिंदे, रूद्र गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आयुष्यात प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभले याबद्दल के. आर पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेस अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचाहत्तर रुपये देणगी व शाळेच्या भौतिक सुविधांसाठी पंचवीस हजार रूपयांची देणगी जाहीर केली.

या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे,भिलवडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. विद्या पाटील,ग्रामपंचायत सदस्या सौ. शेटे, माधवनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अमरनाथ पाटील,कृषी मंडल अधिकारी सतीश पाटील, संचालक धनपाल किणीकर, जयंत केळकर,दादासो चौगुले ,संजय कदम, सचिव मानसिंग हाके, सहसचिव कृष्णा पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एस भोकरे,बी. एन मगदूम, महावीर शेडबाळे, शुभांगी मन्वाचार, एस. एन कुलकर्णी, राजकुमारी यादव,मोहन पाटील, शशिकांत उंडे, प्राचार्य दिपक देशपांडे, सुकुमार किणीकर, सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, जाइंटग्रुप चे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल भोये यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!