कोल्हापूर ः अनिल पाटील
तक्रारदार यांच्याविरूद्ध चंदगङ पोलिस ठाण्यात गून्हा दाखल असून या गून्ह्याचा तपास करीत असलेल्या पोलिस हवालदार राजीव शामराव जाधव ( वय 44) पद पो.हे. काँ. वर्ग 3 नेमणूक चंदगङ पोलिस ठाणे.( मूळ गाव कौलगे ता. गङहिंग्लज) यांनी तक्रारदार यानां पोलिस ठाण्यात बोलवून
घेऊन नोटीस दिली. व गून्ह्यामध्ये अटक करायची नसेल तसेच गून्ह्यामध्ये वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी 5 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. ही लाच तङजोङीअंती 4 हजार 500 रूपये मागितल्याचे निष्पन झाले.याप्रकरणी त्यांच्यावर चंदगङ पोलिसात गून्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजीव बंबरगेकर””पो.ना. संदीप काशिद””पो.काँ रूपेश माने”उदय पाटील आदीनी केली.