डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचारासाठी तुपारी, दह्यारी, घोगाव येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा युवकांशी संवाद
उत्स्फूर्त प्रतिसाद ; आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे आदेश ,महेंद्र आप्पा लाड यांचे मार्गदर्शन

पलूस : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार *डॉ विश्वजीत कदम साहेब* यांच्या आदेशाने व *मा महेंद्र आप्पा लाड* यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस कडेगाव मतदार संघातील युवकांच्या गावागावात बैठका घेतल्या . यामध्ये तुपारी, दह्यारी घोगाव* या गावांचा युवक काँग्रेस पदाधिकारी यांच्या समवेत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी दौरा केला. या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी युवकांशी संवादही त्यांनी साधला.
यावेळी पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव, सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस पदाधिकारी मंगेश मोटे, प्रणाली पाटील, प्रसाद शिंदे, अक्षय सावंत, रोनित मोहिते, आदित्य पाटील तसेच तेथील युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते