आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 

दर्पण न्यूज टाकळीभान: रयत शिक्षण संस्थेच्या, टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालया मध्ये
प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम . शिंदे , पर्यवेक्षक एस.एस . जरे ,प्रमुख पाहुणे संविधान ग्रुपचे संस्थापक विनोद रणनवरे , कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपशिक्षक व्ही .एस .माळी आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयामध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत संविधान ग्रुपचे संस्थापक विनोद रणनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर . एम .शिंदे , पर्यवेक्षक एस .एस . जरे , प्रमुख पाहुणे संविधान ग्रुपचे अध्यक्ष विनोद रणनवरे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही .एस . माळी,प्रमुख वक्त्या श्रीमती एच .एम . राशिनकर व मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनोद रणनवरे म्हणाले की , भारताच्या जडणघडणी मध्ये स्वातंत्र्यवीरांचा, क्रांतिवीरांचा ,समाजसुधारकांचा सिंहाचा वाटा आहे . त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे . कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती एच .एम .राशिनकर म्हणाल्या की , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील विविध उदाहरणे व दाखले देऊन त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मंदिरे, विहिरी, नद्यांवरील घाट बांधली .एक महिला सुद्धा चांगला राज्यकारभार करू शकते हा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजापुढे उभा केला . यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सुंदर रणनवरे , पंकज अमोलिक ,प्रतिक रणनवरे , शंकर रणनवरे , किशोर पंडित ,सुरज शिदे , शामराव खरात ,पंकज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए .ए .पाचपिंड ,सूत्रसंचालन कु . अलिशा भैलिमकर यांनी तर आभार युवराज थोरात यांनी व्यक्त केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!