दुधोंडी येथे जनसंवाद पदयात्रेचे जल्लोषात स्वागत
माजी सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भरसभेत लोकनेते जे के बापू जाधव यांचें केले कौतुक

दुधोंडी –
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. गुरूवारी सातव्या दिवशी ही पदयात्रा पलूस तालुक्यात आली.
दुधोंडी येथून कि्लोस्करवाडी मार्गे पलूस असा मार्गक्रमण करताना या पदयात्रेत आमदार डॉ. विश्वजित कदम, , कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते डॉ. जितेश भैया कदम,जे के बापू जाधव महेंद्र आप्पा लाड सुधीर भैया जाधव शिवाजी राजे जाधव मिलिंद जाधव साहेब माजी सरपंच विजय अप्पा आरबूने यांच्यासह नेतेमंडळी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
या पदयात्रेचे नियोजन माननीय जे के बापू जाधव सुधीर भैय्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना सुधीर भैया जाधव हे गेली महिना भर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन दोन दिवस झाले डिस्चार्ज घेऊन आले होते डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते परंतु पद यात्रेचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करत अंगात अशक्तपणा असून सुद्धा दुधोंडी ते पलूस पदयात्रेत सामील झाले होते.
दुधोंडी गावामध्ये पदयात्री मार्गावरती संपूर्ण रांगोळी काढली होती प्रत्येकाच्या घरावरून आमदार विश्वजीत कदम साहेब यांच्या वरती पुष्पवृष्टी होत होती अतिशय आनंदी वातावरणात व जल्लोषात निघालेली ही पदयात्रा बाजारपेठेतून बाहेर आल्यानंतर आमदार विश्वजीत कदम साहेब यांच्या वरती जेसीबीने फुले टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी विश्वजित कदम यांच्याशी संवाद साधण्यासाठी गर्दी उसळली होती..
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर निघालेल्या या संवाद पदयात्रेच्या माध्यमातून आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी लोकांशी संवाद साधला.
वाटेत भेटलेल्या शाळकरी मुली तसेच शेतकरी वर्ग व दुधोंडी फाटा येथे शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा तोडत असलेल्या माता भगिनींची सुद्धा आमदार विश्वजीत कदम साहेब यांनी त्यांची विचारपूस केलीआमदार डॉ. विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना बुलढाणा ते सांगली पदयात्रा काढली होती. हा मोठा पूर्वानुभव घेतलेल्या व राहुल ब्रिगेडचे सदस्य असलेल्या विश्वजित कदम यांनी या पदयात्रेचेही काटेकोर नियोजन केले.