आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कविता सामूहिक मानवाचे रूप : लता ऐवळे – कदम

सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित ८२ व्या साहित्य संमेलनात कवी संमेलन अनेक कविंचा सहभाग ; रसिकांकडून दाद

 

 

औदुंबर  : साहित्य हे हृदयाचे देणे आहे.कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे.
आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहून कवींनी लिहिल्यास दर्जेदार कविता निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री लता ऐवळे – कदम यांनी केले.
सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित ८२ व्या साहित्य संमेलनात कवी संमेलन प्रसंगी त्या बोलत होत्या.कवयित्री लता ऐवळे- कदम यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात संपन्न झालेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या ७५ प्रतिथयश व नवोदित कवींनी आपल्या रचना सादर केल्या.
त्या म्हणाल्या की, अंकलखोपची मातीने माझ्यावर संयमाचा संस्कार केला.कवी सुधांशु, म.भा.भोसले,सदानंद सामंत यांनी कृष्णाकाठी निर्माण केलेली साहित्य परंपरा ही मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे.
जे आपल्या अनुभवाचं आहे ते सातत्याने लिहित राहिल्यास सकस साहित्याची निर्मिती होते. याच धाग्यावर ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा आजही टिकून आहे आणि चंद्र सूर्य असे पर्यंत टिकून राहील.साहित्य हे हृदयाचे देणे आहे.कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे.कविता ही पूर्णत्वाचा,सौंदर्याचा ध्यास आहे.अनुभवांचे भरलेले घट म्हणजे कविता असते.यावेळी त्यांनी ‘नक्की काय नसतं बाइकडं’,’धागा’ या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.पुरुषोत्तम जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
कवी सुभाष कवडे,प्रा.संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले.ऋषिकेश जोशी यांनी आभार मानले.
यावेळी अपर्णा कुलकर्णी,चैतन्य माळी,प्रसन्न माळी,युवराज पाटील,वसुधा सुर्वे, बाबासो पाटील,वीर भगवान,अनंत देगवेकर,निवास म्हात्रे,सुमंत सगरे,मिलिंद कुलकर्णी,शंकरराव पाटील,दत्तात्रय चव्हाण,काकासाहेब देशमुख,जगन्नाथ विभूते,जगन्नाथ विभूते,सिराज शिकलगार, आर्या जोशी,अनिल तावरे,सुभाषचंद्र भाटी,विनय जोशी,तानाजी माळी,चंद्रकांत कन्हेरे,नामदेव जाधव,आनंदराव जाधव, विलास पाटील,अखिलेश सूर्यवंशी,जगन्नाथ पाटील,विश्वंभर जोशी,अनुसया पाटील,बजरंग गावडे,चंद्रकांत जाधव,ऋतुजा माने,राजेंद्र औंधकर,सुषमा डांगे, नसीमा मुजावर,रमेश चव्हाण,भारती पाटील,अनिल पाटील,संजय पुजारी,बाबासाहेब हेरवाडे,आबासाहेब शिंदे, सुभाष पाटील,प्रभाकर पाटील,अलका सूर्यवंशी,मन्सूर जमादार,अरुणा नायकवडी,विनय कुलकर्णी,राम सुतार,एकनाथ निकुंभ,रघुराज मेटकरी,प्रभाकर पाटील,मोहन खोत,दत्ता गायकवाड,ऋतुजा माने,मानसी शेटे,सविता गावडे,सुधा पाटील,रमेश गायकवाड,तानाजी नांगरे आदींनी कविता सादर केल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!