महाराष्ट्र
सङोली खालसा येथे मधमाशांच्या हल्ल्यात एक जण जखमी

कोल्हापूरःअनिल पाटील
वैरण कापत असतानां मधमाशांनी हल्ला केल्याने एक जण जखमी झाला. हिंदूराव तूकाराम पाटील वय 60 रा. सङोली खालसा ता. करवीर असे त्यांचे नाव आहे.
आज सकाळी 10 वाजण्याच्या सूमारास ते गेरवाट नावाच्या शेतामध्ये जणावरानां वैरण आणण्यासाठी गेले होते. वैरण कापत असताना बांधामध्ये असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला विळा लागल्याने मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) उपचार सूरू आहेत.