महाराष्ट्र

लोकनेते जे के बापू जाधव हे व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहकारातील तारा : कुणाल राऊत

दुधोंडी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह मान्यवरांचा सन्मान

दुधोंडी  :-

लोकनेते जे के बापू जाधव हे व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहकारातील तारा , असे कुणाल राऊत म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सांगली जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचा दौरा आयोजित केला होता, यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चिब तसेच सह प्रभारी एहसान अहमद खान तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत, उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे, महाराष्ट्र युवक काँग्रेस चे प्रवक्ते दीपक राठोड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव अनिकेत आरकडे, महासचिव ऋषिकेश ताटे, यांनी दुधोंडी येथे मानसिंग को ऑप बँकेला भेट दिली.

यावेळी दूधोंडी युवक काँग्रेस च्या वतीने सर्व पदाधिकारी यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला
यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के बापू जाधव व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे महासचिव मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर भैय्या जाधव प्रमुख उपस्थित होते,
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकनेते जे के बापू जाधव हे व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सहकारातील तारे आहेत त्यानी मानसिंग बँक उभा केली आहेच आणि त्या माध्यमातून कृष्णाकाठ उद्योग समूहाचे जाळे निर्माण या भागात केले आहे, त्यामुळे सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यास व समाजकार्यास मदत बापूंच्या माध्यमातून होत आहे, बापू नेहमी सर्वसामान्य लोकांचे हित जोपासत असतात आणि दूधोंडी गावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक बापूंच्याच मुळे आहे असे म्हणता येईल, त्यामुळे मी बापूना इतर कामातही शुभेच्या देतो, तसेच सुधीर याचे काम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मध्ये खूप छान काम करीत आहे, तो दिल्ली मुंबई नागपूर अशा अनेक ठिकाणी त्याचे काम केलेले आम्ही पाहिले आहे, तो विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे, आणि बापूंसारख्या व्यक्तिमत्त्वाचा आशीर्वाद पाठीशी असल्याने तो खूप चांगले काम करीत आहे, भविष्यात याच्या पेक्षाही मोठी संधी सुधीर ला मिळेल यात कोणतीही शंखा नाही, त्याचे आणि माझे मित्रत्वाचे संबंध हे अनेक वर्षापासून आहेत आणि इथून पुढेही अधिक दृढ होतील असे मत त्यानी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले.
तर यावेळी सांगली जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे अध्यक्ष डॉ. सुशील गोतपागर, जिल्हा उपाध्यक्ष राजू वलांडकर, सरचिटणीस नितीन सुतार, पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, उपाध्यक्ष प्रणाली पाटील, खानापूर आटपाडी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अभिजित पाटील, सरचिटणीस मंगेश मोटे, अक्षय सावंत, प्रसाद शिंदे, भारती शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद जाधव, दूधोंडी गावचे माजी सरपंच विजय आरबूने, माजी उपसरपंच रवींद्र नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ नागराज रानमाळे, पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील नलवडे, मानसिंग बँकेचे संचालक सतीश धनवडे, संदीप पाटील, तसेच दूधोंडी गावातील युवक मित्र व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थीत होते, यावेळी स्वागत पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी केले तर आभार सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ सुशील गोतपागर यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!