महाराष्ट्र

हातकणंगले तहसील कार्यालयात पोषण महिन्याच्या निमित्त मल्टी मीडिया प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न

 

कोल्हापूर : – केंद्रीय संचार ब्यूरो आणि तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती हातकणंगले यांच्या संयुक्त विद्यमाने हातकणंगले तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये पोषण माह तसेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष या विषयावर मल्टी मिडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये भरड धान्ये, पोषण माह तसेच सरकारचे मिशन इंद्रधनुष या बाबतीत माहिती मांडण्यात आली आहे.तसेच स्वच्छता ही सेवा या अभियानाविषयी आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आदींविषयी देखील माहिती मांडण्यात आली आहे

या प्रदर्शनीमध्ये इतर माहिती बरोबरच डिजिटल माध्यमातून देखील माहिती प्रदान करण्यात येईल. तीन दिवसांच्या या पोषणविषयक सोहळ्यामध्ये पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच इतर स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येईल.

या प्रदर्शनीला मोठय़ा प्रमाणावर भेट देऊन नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी केले आहे. आज मल्टी मिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. पोषण माह निमित्त आयोजित ही प्रदर्शनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून पोषण माह चे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका अगदी डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे आहाराचे मार्गदर्शन करत असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

यावेळी हातकणंगले तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीचे विविध अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारचा केंद्रीय संचार ब्यूरो विभाग विविध सरकारी योजनांवर प्रदर्शनी तसेच इतर प्रसिद्धी कार्यक्रमांचे आयोजन करत असतो

पोशन माह, ज्याला राष्ट्रीय पोषण महिना म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश पोषणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आहे. सप्टेंबरमध्ये महिनाभर चालणारी मोहीम देशातील कुपोषणाच्या विशेषत: महिला आणि मुलांमधील महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते.
सकारात्मक वर्तणुकीतील बदलांना प्रेरणा देण्यासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी सामूहिक जबाबदारीची भावना वाढवण्यात पोषण माह महत्त्वाची भूमिका बजावतो. समुदाय आणि व्यक्तींना एकत्र आणून हे अभियान लोकांसाठी एक निरोगी आणि अधिक पोषणयुक्त भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!