कोल्हापूरात श्रम फाउंडेशन’च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

कोल्हापूर : – अनिल पाटील
कोल्हापूरात श्राम फौंङेशनच्या वतीने आज देवी इंदुमती बोर्डिंग आझाद चौक कोल्हापूर येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी श्रम फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी देवी इंदुमती बोर्डिंग ला कायमस्वरूपी अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमाफोटो प्रतिमेचे प्रतिमा प्रेझेंट देऊन फोटोस पुष्पहार घालून अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कार्याचा आढावा घेतला त्याप्रसंगी देवी इंदुमती बोर्डिंगचे संचालक राजू मालेकर साहेब अधीक्षक राजाराम कांबळे साहेब तसेच वन अधिकारी आणि सत्यशोधक समाजाचे नेते आदरणीय जाधव साहेब यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनशैलीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी मार्गदर्शन केले सदर प्रसंगी चर्मकार समाजाचे नेते दिलीप भाऊ खांडेकर जी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहीली.