आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
मिरज येथे सेवासदन आरोग्य समूहाचे संचालक योगेश पाटील यांचा जनसुराज्य पक्षांमध्ये प्रवेश ; प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्यावतीने सन्मान

दर्पण न्यूज मिरज :- सेवासदन संस्थेच्या माध्यमातून ३०० हून अधिक लोकांना रोजगार देणारे आणि विविध व्यवसाय चालवणारे सेवासदन आरोग्य समूहाचे संचालक योगेश पाटील यांनी जनसुराज्य युवाशक्तीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना योगेश पाटील यांनी समितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी आणि समाजसेवेसाठी अविरत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.