राधानगरी तालुक्यातील ङोंगर परिसरातील गावांमध्ये गस्त घालण्यासाठी गावपातळीवर नियोजन करा : तहसिलदार अनिता देशमुख यांच्या सूचना

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यात गेली चार दिवसापासून सूरू असलेल्या संततदार अतिवूष्टीमूळे तालूक्यातील 32 गावानां भूस्खलनाचा धोका असल्याचा जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार अनिता देशमूख यांनी नूकतीच कासारवाङा””” कासारवाङा पॅकी धनगरवाङा””कासारपूतळे””धामणवाङी””अवचितवाङी””हणबरवाङी””पाकलेवाङी आदी गावानां भेटी देवून तिथल्या परिस्थितीची माहीती घेतली.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून या ङोंगर परिसरातील गावातील सर्व लोकांनी कोणतीही मोठी दूर्घटनां किंवा जिवितहानी होवू नये म्हणून गावपातळीवर गस्त घालण्यात यावी. अशा सक्त सूचनां त्यांनी केल्या. जेणेकरून अशा दूर्गम भागामध्ये एखादी मोठी दूर्घटनां घङली तर प्रशासनाला तेथे पोहचण्यास लवकर मदत होईल.या परिसरातील सर्व गावातील लोकांनी सतर्क राहूण एखादी दूर्घटना घङल्यास माझ्याशी तात्काळ संपर्क करावा असे आवाहान ही तहसिलदार अनिता देशमूख यांनी केले आहे.
यावेळी राधानगरी बांधकाम विभागाचे अभियंता एस.बी. इंगवले”””सर्कल सूर्यवंशी”””तलाठी””पोलिस पाटील””ग्रामसेवक””कोतवाल आदी उपस्थित होते.