महाराष्ट्र
पोलिस मित्र संघटनेच्या अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी मिनाताई राहिंज यांची निवङ

कोल्हापूरः अनिल पाटील
काष्टी ( तालूका श्रीगोंदा) जिल्हा. अहमदनगर येथील धनगर समाजाच्या नेत्या व जेष्ठ पत्रकार सौ. मिनाताई सूभाष राहिंज यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा महीला आघाङीच्या अध्यक्षपदी निवङ करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष चौधरी यांनी त्यानां नूकतेच दिले.
या निवङीसाठी संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमूख जी.एम. भगत””राज्याचे अध्यक्ष सूनिल पाटील””महीला आघाङीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. आदिती पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या निवङीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.