भिलवडी येथील सरगम ज्वेलर्सच्या १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
सरगम ज्वेलर्सचे १ ग्रॅम सोन्यांंच्या दागिन्यांच्या दालनाचा शुभारंभ

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सरगम १ ग्रॅम सोन्याचे दागिने व मोत्याचे दागिने या दुकानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य जनतेला सोने खरेदी करणे आवाक्याच्या बाहेरचे झाले आहे. त्यामुळे शुभकार्यासाठी सर्व सामान्यांना अंगावरती घालण्याकरिता कमी किमतीत सोन्यासारखे दिसणारे दागिणे मिळावेत या उद्देशाने सरगम ज्वेलर्स व सरगम १ ग्रॅम गोल्ड दुकानाचे सर्वेसर्वा जगदिश माळी यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी उत्तम अशी सोय भिलवडी ते करून दिली आहे.
पलूस तालुक्यातील
भिलवडी बाहेर गल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या या दुकानांमध्ये विविध प्रकारचे एक ग्रॅम सोन्याचे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, या दुकानाचा शुभारंभ सौ. स्मिता चितळे यांच्या हस्ते व जायंट्स सहेली ग्रुपच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर, एम बी पाटील मॅडम, क्रांती पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी भिलवडी आणि परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान दुकानाचा शुभारंभ झाल्यानंतर उपस्थित महिलांसाठी विविध प्रकारच्या फनी गेम्सचे आयोजन ही करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. दुकानाच्या शुभारंभासाठी आणि हळदीकुंकू समारंभासाठी आलेल्या महिलांना सरगम ज्वेलर्स कडून प्रत्येकी एक साडी दिपावली भेट म्हणून देण्यात आली.अशी माहिती सरगम ज्वेलर्स व सरगम १ ग्रॅम गोल्ड दुकानाचे सर्वेसर्वा जगदिश माळी यांनी दिली आहे.