बांधकाम कामगारांची नोंदणी सुरळीतपणे सुरू करा: अन्यथा, मंडळाच्या मुंबईतील मुख्यकार्यालया समोर आंदोलन ;वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली

मुंबई : बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी मंडळाची वेबसाईट पूर्वीप्रमाणे खुली करावी या मागणीसाठी आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक, कष्टकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्ह्याच्या वतीने, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा विवेक कुंभार यांना, सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या सचिव यांच्या लेखी आदेशानुसार दि. ०८/१०/२०२४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत बांधकाम कामगारांची नव्याने नोंदणी करणे, नुतनीकरण करणे, लाभ वाटप करणे, सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप करणे, गृहउपयोगी संच वाटप करणे, आवास योजनांचे नवीन मान्यता देणे याचबरोबर इतर अनेक प्रकारचे योजना बंद ठेवण्यात आले होते. याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संयुक्त कृती समिती व इतर संघटना यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल केली क्र.३३५९७/२०२४ च्या दाखल केलेल्या याचिकेवर दि. ०६/११/२०२४ मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी मंडळाच्या सचिवांनी घेतलेले सर्व निर्णय अमान्य केले असून आचारसंहिता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास लागू होणार नाही असे खडसावून सांगितले आहे. यांचा राग मनात धरून, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची नियुक्ती नसताना, मंडळाच्या सचिवांनी मनमानी पद्धतीने तडकाफडकी एकतर्फी निर्णय घेवून तालुका निहाय सुविधा केंद्रातच बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नुतनीकरण व इतर लाभाचे अर्ज भरण्याची जाचक अट निर्माण केलेली आहे. मात्र बांधकाम कामगारांच्या हिताचे निर्णय आजतागायत प्रलंबित ठेवलेले आहेत. वास्तविक पाहता ठराव क्र.५८ (८)/२०२१ केंद्र शासनाकडून इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियम व सेवाशर्ती) १९९६ च्या कलम ६० अंतर्गत निर्गमित दि.२२/०३/२०२१ रोजीच्या आदेशानुसार मंडळाने नोंद घेवून सर्वानुमते पारित करण्यात आलेला विषय क्र .९ ठरावानुसार –
बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण,लाभ वाटप, बांधकाम कामगारांचे समुपदेशन व अन्य सुविधांकरीता तालुका स्तरावर सुविधा केंद्र स्थापन विचार विनिमय करणे यामध्ये बांधकाम कामगारांना त्यांच्या वेळेनुसार कधीही, कोठेही मंडळाच्या वेबसाइटच्या माध्यमातून नोंदणी करण्याची मुभा देवून तालुका निहाय सुविधा केंद्र सुरू करण्याबाबतचे निर्णय घेतला आहेत. असे असतानाही केवळ तालुका निहाय सुविधा केंद्र खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी चालवीने व जाणिवपूर्वक बांधकाम कामगारांच्या कायदेशीर हक्काची वेबसाईट बंद केली आहे हे स्पष्ट झाले आहे. बांधकाम कामगारांना रोजच्या रोज कामावर गेल्याशिवाय त्यांचा घर खर्च चालत नाही व घरात कितीही समस्या, अडचणी असल्यास अंगामध्ये अनेक शारीरिक व्याधी व काही वेळेस वेळप्रसंगी असणारा ताप थंडीला सुद्धा विसरून प्रथम कुटुंब डोळ्यासमोर ठेवून त्याना आपल्या उदरनिर्वाहासाठी डबा घेऊन कामावर जावेच लागत आहे.
कामगारांनी काम केल्यानंतरच त्यांना मोबदला मिळतो तेव्हाच ते आपल्या कुटुंबाचा पालनपोषण करणे शक्य होते परंतु तालुका निहाय सुविधा केंद्रात नोंदणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले खाजगी कंपन्यांचे कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिले गेलेले नाही याचबरोबर त्यांची शैक्षणिक पात्रता फारच कमी दिसत आहे. त्यांच्याकडून एका तालुका निहाय सुविधा केंद्रात रोज फक्त तीसच कामगारांची नोंदणी करणे शक्य होत आहे. यामुळे परत दुसऱ्या दिवशी बांधकाम कामगारांना आपले सर्व काम बुडवून दररोज तालुका निहाय सुविधा केंद्रात नोंदणी करता नंबरला उभे रहावे लागत आहे. यामुळे श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगारांचे आर्थिक, शारीरिक नुकसान व पिळवणूक होत आहे. तरी ताबडतोब पूर्वी प्रमाणे बांधकाम कामगारांना स्वतःची नोंदणी आपल्या वेळेनुसार करण्यासाठी मंडळाची वेबसाईट पूर्ववत सुरू करून त्यांची होणारी पिळवणूक व फसवणूक टाळण्यासाठी निर्णय घ्यावा तसेच तालुका निहाय सुविधा केंद्रात व इतर कामांसाठी बाह्य मनुष्यबळ पुरविण्यासाठी दिलेला ठेका रद्द करून त्याजागी कामासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे.
जा.क्र. १२५/२०२४/ संघट – २०२४/प्र.क्र.२२७/ मंडळ – ०६ या विषया नुसार,
सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली , वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या प्रतिनिधीसोबत दि. १५/०७/२०२४ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त मध्ये नमूद केले अनुक्रमणिका २ प्रमाणे आपण बांधकाम कामगारांच्या सुरक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व गुणवत्तेनुसार मंडळाकडे कामासाठी तपासून घेण्यात येईल असे लेखी कळविले आहे. यानुसार बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला मंडळात कामासाठी घेऊन कामगारांचे सक्षमीकरण करावे तसेच खाजगी कंपन्यांना वाटले जाणारे मंडळाचे निधी वाचवून शिल्लक राहिलेला निधीतून मंडळाला बळकटी करण मिळेल. तरी ताबडतोब पूर्वी प्रमाणे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट सुरू करून बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी/ नुतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार भरण्यासाठी मुभा देवून बांधकाम कामगारांची होणारी मानसिक आणि शारीरिक पिळवणूक थांबवावी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अतिरिक्त कामासाठी श्रमिक, कष्टकरी, नोंदीत बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला, कुटुंबातील एका पात्र व्यक्तीस त्यांच्या शैक्षणिक पात्रते नुसार नोकर भरती मध्ये सामावून घ्या. अन्यथा मुंबईतील मंडळाच्या मुख्य कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे यांची नोंद तथा दखल घ्यावी.
होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन तसेच मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव जबाबदार राहणार आहेत आशा इशारा देण्यात आला आहे. यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे साहेब, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, सांमिकु मनपा अध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, दिपाली वाघमारे, सुजित भारती, संग्राम मोटकट्टे, संतोष पंडित यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.