कुंडल दुधोंडी रस्त्यावर कुंडल प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीला रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात गळती

*दुधोंडी (प्रतिनिधी):- जुलै महिना गेला तरी महाराष्ट्रामध्ये तसेच सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली जात असताना कुंडल पेट्रोल पंप ते दुधोंडी रस्त्यावर कनुजे रोपवाटीका बर्फ फॅक्टरी जवळ गेली दोन ते तीन वर्ष झाले कुंडल प्रादेशिक योजनेचे कुंडल ग्रामपंचायतीच्या जलवाहिनेला रस्त्यावरच गळती लागली आहे, या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाणी रस्त्यावरच वाहून जात आहे, आणि त्यामुळे रास्ता पण खराब होत असल्याने पाणीपुरवठा विभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे तक्रार करून ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.*
*ही गळती बऱ्याच दिवसापासून आहे त्या स्थितीतच आहे, प्रवासी वाहनधारक या दुधोंडी रस्त्यावरून वाहतूक मोठी असल्याने ये जा करीत असतात, याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी ज्या त्या विभागांना देण्यात आल्या होत्या, मात्र पाणीपुरवठा विभागाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे, मुख्य म्हणजे रस्त्यावरच गळती असल्यामुळे रस्त्यावरूनच हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि वाहतूक करताना त्या ठिकाणी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, एकीकडे पणीपुरावठ्यात सातत्य नसताना गळतीमुळे वाया जाणाऱ्या पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र नाराजी आहे, त्यामुळे लवकरात लवकर गळती काढावी अन्यथा याविषयी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांमधून होत आहे*
*चौकट*
*[कुंडल पेट्रोल पंप ते दुधोंडी कडे जाणार रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यात आला होता, दुधोंडी करांचा हा मुख्य रास्ता दळणवळणाचा मुख्य समजला जातो, मात्र या रस्त्याकडील शेतकऱ्यांनीच मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, रस्त्याला साईट पट्टी आहे का नाही हेच लक्षात येत नाही हत्ती ग्रास, उकिरडा, शोभेची झाडे साईट पट्टीवरच लावल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे, एकाच वेळी दोन वाहनांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, पावसाळ्यात तर या रस्त्यावर वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे, त्यांनी लक्ष देऊन रस्त्यावर अतिक्रमण काढून घ्यावे असे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.]*