दुधोंडी सारख्या गावाला सुवर्ण पदक विजेता निशा आरबुने हिचा अभिमान : लोकनेते जे के (बापू) जाधव

दूधोंडी (प्रतिनिधी): दूधोंडी गावचे सुपुत्र नंदकुमार आरबूने यांची कन्या निशा आरबूने हिने २६ वी कॅप्टन इजिकल मेमोरियल महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळाल्याने दूधोंडी येथे कृष्णाकाठ उद्योग समुहाचे शिल्पकार तसेच लोकनेते जे के (बापू) जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार व सन्मान करुन तिचे अभिनंदन केले.
दूधोंडी सारख्या ग्रामीण भागातील मुलगी नेमबाजीच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून गावाचे नाव उंच शिखरावर पोहचवले आहे, आमच्यासारख्या दूधोंडी गावातील सर्वसामान्य माणसांना हिचा अभिमान आहे, निशाने अशा अनेक स्पर्धेमध्ये नावलौकीक करुन गावाचे नाव मोठे करावे, अशाप्रकारच्या मुली दूधोंडी गावात विविध स्पर्धेमध्ये तसेच शिक्षणामध्ये तयार व्हाव्यात, यासाठी कृष्णाकाठ उद्योग समुह नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे मत कृष्णाकाठ उद्योग समुहाचे शिल्पकार जे के बापू जाधव यांनी व्यक्त केले
यावेळी या सत्कारप्रसंगी निशा आरबूने यांचे वडील नंदकुमार आरबूने, पुणदी चे अरविंद पाटील, दूधोंडी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ नागराज रानमाळे, कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रियेचे चेअरमन जोतीराम साळुंखे, मानसिंग बँकेचे संचालक हणमंत कारंडे, दूधोंडी ग्रामविकास सोसायटीचे माजी चेअरमन शहाजी जाधव, पुणदीचे लक्ष्मण गुरव, कृष्णाकाठ डी हायड्रेशन चे मॅनेजर दिगंबर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.