महाराष्ट्र
लोकनेते जे. के. बापू जाधव यांच्याकडून रामशेठ ठाकूर यांचा सत्कार

दूधोंडी (प्रतिनिधी:):- महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे अध्यक्ष जे. के. बापू जाधव यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
तसेच रामशेठ ठाकूर यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त जे. के. बापू जाधव यांनी अभिष्टचिंतनपर शुभेच्छा दिल्या. यावेळी जयंत पवार, निशिकांत जाधव व इतर रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी उपस्थित होते.