आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

कोल्हापूरात 7 सप्टेंबरला नॅशनल आयडियल टीचर अवॉर्डचे वितरण

 

कोल्हापूरः अनिल पाटील

इंडियन टीचर्स फोरमच्या वतीने देण्यात येणारा सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून भरीव योगदान देणाऱ्या शिक्षक व शिक्षिकांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्डने रविवार, दि. 7 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र, राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
समाजशास्त्रज्ञ डॉ. डी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास सिनेअभिनेते संजय मोहिते, विचारवंत जॉर्ज क्रुज, दिग्दर्शक अनिल म्हमाने, नॅशनल टीचर अवार्ड विजेते सागर बगाडे, डॉ. शोभा चाळके, मोहन मिणचेकर, ॲड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या वर्षीचा नॅशनल आयडियल टीचर जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर स्मृतीशेष डी. जी. राजहंस गुरुजी, मांगुर, कर्नाटक, डॉ. वसंत भागवत, इचलकरंजी यांना जाहीर झाला असून शंकर पुजारी (कोल्हापूर), सुलभा सावंत-देसाई (गोवा), सुनिता कांबळे-अंबेकर (दादरा आणि नगर हवेली), विजयकुमार कांबळे (सांगली), डी. सी. डुकरे (परभणी), विजयकुमार काळे (सातारा), मनिषा कांबळे (सांगली), बाळासाहेब बोडके (कोल्हापूर), महेंद्र रंगारी (अमरावती), सुवर्णा माने (कोल्हापूर), शैलजा परमणे (कोल्हापूर), स्वाती यादव (सातारा), प्रेमदास मेंढुलकर (चंद्रपूर), कविता पाचपोर-गीते (अकोला), शीतल वांढरे (अहमदनगर), डॉ. तनुजा परुळेकर (मुंबई), सुनिता सावंत (सांगली), सुनिल घाडगे (कल्याण), राजाराम डकरे (पन्हाळा), अर्जुन भोई (ठाणे), सुरेश कुंभलकर (यवतमाळ), सचिन गायकवाड (कोल्हापूर), अशोक भोसले (कोल्हापूर), विद्या नाळे (कोल्हापूर), विश्वनाथ पाटील (चंदगड), पल्लवी चौगुले (इचलकरंजी) यांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शिक्षक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान समन्वयक अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला ॲड. करुणा विमल, सुरेश केसरकर, संजय ससाणे, विश्वासराव तरटे, अंतिमा कोल्हापूरकर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!