महाराष्ट्र

सांगली अर्बन बँक भिलवडी शाखा 52 वा वर्धापन दिन उत्साहात

 भिलवडी:-
सांगली अर्बन को ऑप बँकेची भिलवडी शाखा 51 वर्षाची अखंड सेवा पुर्ण करून 52 व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे निमित्ताने ग्राहक मेळाव्याचे आयोजन जानकी हॉल भिलवडी येथे करण्यात आले होते.यावेळी बँकेचे अध्यक्ष मा.गणेशकाका गाडगीळ बँकेचे नुतन संचालक मा.विश्वास चितळे ,बँकेच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष उद्योगपती मा.गिरीशजी चितळे.भिलवडीचे नूतन पोलीस निरीक्षक मा.नितीन सावंत साहेब हे प्रमुख उपस्थितीत होते.मा.सावंत साहेब यांनी यावेळी सायबर क्राईम यामध्ये मोबाईल व ए टी एम बँकिंग मधील फसवणुकीचे बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले.
नुकतेच भिलवडी परिसरातील खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीस मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत पंडित दीनदयाल पंचायत सतत विकास अंतर्गत देशातील प्रथम दारिद्र मुक्त ,ग्रामपंचायत व वर्धित उपजीविका असणारे गाव म्हणून मानपत्र,स्फूर्तिचिन्ह व रु 1 कोटी बक्षीस देऊन सन्मानित करणेत आले आहे त्याबद्दल बँकेने तेथील सरपंच मा.धनंजय गायकवाड व उपसरपंच व बँकेचे खातेदार मा.उत्तमराव जाधव यांच्या कार्याचा गौरव केला.
बँकशी संबंधित असलेले पैकी नव्याने पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध निवडून आलेले मा.महावीर किणीकर, मा.सत्पाल साळुंखे व मा.सुदीपजी गडदे यांचा सत्कारयावेळी संपन्न झाला.तसेच भिलवडी दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन यांना समाजभूषण पुरस्कार मिळाले बद्दल मा. बाळासाहेब चौगुले व तज्ञ संचालक मा.संजय पाटील सर यांना ही सन्मानित करणेत आले.
बँकेच्या जुन्या सभासद भिलवडी सारख्या गावी संगीत साधना करुन या क्षेत्रातआपली शिष्य परंपरा उभारणाऱ्या सौ.प्राजक्ता ताई कुलकर्णी यांना राज्यस्तरीय ” नारी शक्ती”पुरस्काराने गौरविण्यात आले बद्दल त्यांचा ही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाले बद्दल कु.श्रावणी मोकाशी यांचाही गुण गौरव करणेत आला
बँकेचे तज्ञ संचालक मा.विश्वास चितळे यांना इंडियन डेअरीकडून “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित करणेत आले याबद्दल बँकेचे चेअरमन मा. गणेशकाका गाडगीळ यांनी त्यांचा गौरव केला.सत्कार मुर्तींच्या मनोगता नंतर
मा.चेअरमन गणेशकाका गाडगीळ यांनी बँकेच्या प्रगतिशील वाटचालीचा आढावा उपस्थित सर्व सभासद,ठेवीदार, यांचे समोर मांडला
या कार्यक्रमास बँकेचे संचालक मा.एच वाय पाटील ,मा.बापु हरदास,सौ.स्वाती करंदीकर, सौ.अश्विनी आठवले, मा.रवींद्र भाकरे, मा.मनोज कोरडे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक ,पालक अधिकारी तेजकुमार बनकर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून शाखा सल्लागार मा.रघुनाथ भाऊ देसाई,मा.विजय आण्णा चोपडे, मा.शहाजी गुरव ,मा.अनिल चोपडे,मा.मनोज नवले व मा.श्रीकांत निकम यांनी मोठे प्रयत्न केले होते.यावेळी बहुसंख्येने बँकेच्या परिवारातील सभासद ,ठेवीदार ,कर्जदार, हितचिंतक उपस्थित होते .
भिलवडी परिसरातील बहुसंख्य व्यवसायिक उद्योगानां त्यांच्या उमेदवारीच्या काळात
बँकेने समर्थ साथ दिल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.विश्व कल्याणचे मागणे असलेल्या माऊलींच्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!