सेकंडरी स्कूल भिलवडीचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यश : ग्रामस्थांकडून मुलांचे कौतुक
भिलवडी – भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ( NMMS) कु. सानिका संजय साळुंखे हिने 123 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत EWS प्रवर्गात 2 रा क्रमांक मिळविला. तसेच राज्य शासनाच्या सारथी या संस्थेच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती कु.पाटील उत्कर्षा कृष्णराज , पाटील तेजल विकास, पाटील श्रावणी दिलीप ,यादव श्रद्धा दिलीप ,साळुंखे सोनम विजयसिंह,पाटील समृद्धी सुधीर ,परब आर्या प्रदीप,पाटील हर्षवर्धन रवींद्र ,सूर्यवंशी प्रतीक्षा रमेश ,मोकाशी निखिल अरुण,जाधव आर्यन अभिजीत,यादव हर्षवर्धन श्रीकांत,जाधव श्रुती श्रीकांत ,पाटील समीक्षा सतीश,भोळे प्राची दिलीप,पाटील समीक्षा संभाजी ,चव्हाण पृथ्वीराज सतीश,कणसे संस्कृती राहुल,सूर्यवंशी संकेत दादासो ,जाधव आदित्य अभिजित या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली .
या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , विश्वस्त व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक एस. एल माने, पर्यवेक्षक संजय मोरे यांनी केले.स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख विजय तेली, NMMS विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भगरे, मार्गदर्शक- राजीव आरते, प्रल्हाद पाटील, पौर्णिमा धेंडे, प्रमोद काकडे, तुषार पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.शाळेने स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेचा आलेख चढता ठेवल्याने शाळा व संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.