श्रीपती शुगर अँड पॉवर लि. डफळापूर-कुडनूर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन, दुसऱ्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ : आमदार डॉ विश्वजीत कदम यांची सपत्नीक उपस्थिती

जत -: सांगली जिल्हा जत तालुक्यातील श्रीपती शुगर अँड पॉवर लि. डफळापूर-कुडनूर या कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन व दुसऱ्या ऊस गळीत हंगामाच्या शुभारंभ समारंभास माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम हे सपत्नीक उपस्थित राहिले . तसेच ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच डॉ विश्वजीत कदम यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत श्रीपती शुगर अँड पॉवर लि. ची वाटचाल सुरू आहे. या कारखान्यामुळे जत व कवठे महांकाळ या दोन्ही तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाची चिंता कायमस्वरूपी मिटली आहे. कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला असून, कारखाना कार्यक्षेत्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीतजास्त भाव देण्यासाठी कटिबद्ध असून, दुसरा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आमदार मोहनशेठदादा कदम, मातोश्री श्रीमती विजयमाला कदम, खासदार. विशालदादा पाटील, सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विक्रमसिंहदादा सावंत, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्रअप्पा लाड, ऋषीकेश लाड, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथकाका कदम, ‘श्रीपती शुगर’ चे सरव्यवस्थापक महेश जोशी , उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्यासह इतर मान्यवर, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.