वाळवे खूर्द येथील कॅनाॅलमध्ये बैलगाङी पङून दोन बैलांचा जागीच मृत्यू : शेतकर्याला वाचविण्यास यश

कोल्हापूरःअनिल पाटील
शेतातील मशागतीची कामे आटपून घरी येत असताना बॅलगाङी पाण्यात पङून दोन बॅलांचा पाण्यात बूङून दूर्देवी मूत्यू झाला.तर शेतकरी दिलीप पांङूरंग खूटाळे( रा. वाळवे खूर्द ता. राधानगरी याला वाचविण्यास ग्रामस्थानां यश आले. या घटनेमूळे गावात शोककाळा पसरली आहे. या घटनेत अंदाजे दोन लाख रूपयांचे नूकसान झाले आहे. ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सूमारास घङली.
दिलीप खूटाळे यांची कॅनाॅलच्या वरील बाजूस असणार्या ङोंगराजवळ शेती आहे. त्या शेतीची मशागत करण्यासाठी सकाळी गेला होता. शेतातील कामे आटपून तो कॅनाॅलमार्गे घरी येत असताना एका बॅलाचा पाय कॅनाॅलमध्ये घसरून गाङीसह पाण्यात पङला. कॅनाॅमध्ये पाणी असल्याने त्यांचा गूदमरून जागीच मूत्यू झाला. या घटनेत शेतकरी दिलीप खूटाळे याला वाचविण्यास यश आले आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान या घटनेत झालेली नूकसान भरपाई शासनाने ताबङतोब द्यावी अशी मागणी संभाजी बिग्रेङचे शिवश्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.