क्रीडामहाराष्ट्र

चंद्रकांत चषक -२०२३”चा पीटीएम मानकरी : शिवाजी तालीमला उपविजेतेपद : स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

 

कोल्हापूर : अनिल पाटील

“चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेत स्पर्धेतील अंतिम सामना आज पाटाकडील तालीम मंडळ विरूध्द श्री शिवाजी तालीम मंडळ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात पीटीएम संघाने शिवाजी संघाचा ३-१ असा पराभव करून “चंद्रकांत चषक -२०२३” वर नाव कोरले. विजेत्या पीटीएम संघाला २लाख ३१ हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या शिवाजी संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले
श्री नेताजी तरूण मंडळ व जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरवात श्रीमंत यशराज छत्रपती, तेजस सतेज पाटील, आरबीएलचे मार्केटिंग हेड अभिजीत सोमवंशी, प्रकाश गुप्ता, काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे प्रदेश सचिव व युवा उद्योजक सत्यजित जाधव, चेतन नरके, जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, रोहीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, युवा उद्योजक व काँग्रेस औद्योगिक सेलचे सचिव सत्यजित जाधव, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे ओएसडी अमित कामत, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, अर्जुन माने, जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, गोशीमाचे अध्यक्ष दीपक चोरगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
पीटीएम विरूध्द शिवाजी सामन्यात पूर्वार्धात २२व्या मिनिटाला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यांने गोल केला. मध्यंत्तरापर्यंत पीटीएमने १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातमध्ये ४८ व्या मिनिटाला शिवाजी संघाच्या इंद्रजीत चौगुले यांने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पीटीएमच्या अॅडी सोमेडीने ५९ व्या व ६२ व्या मिनिटाला असे सलग दोन गोल करत सामन्यात ३-१ गोलची आघाडी घेतली. सामन्याच्या पूर्ण वेळेत पीटीएमने शिवाजी संघाचा ३-१ असा पराभव करून, “चंद्रकांत चषक -२०२३” पटकावला.
एकूण ५ लाख रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव खेळाडूंवर करणाऱ्या फुटबॉल स्पर्धेविषयी शौकिनांमध्ये सुरुवातीपासून उत्सुकता होती. स्पर्धा दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत गेली. अंतिम फेरीत ‘पाटाकडील’ आणि ‘श्री शिवाजी’ यांच्यातील सामन्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन केले होते. आणि सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केल्याने मैदान खचाखच भरले होते.
सामन्यात मध्यंतरावेळी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, युवा उद्योजक व काँग्रेस औद्योगिक सेलचे सचिव सत्यजित जाधव, तेजस सतेज पाटील, रोहीत पाटील,
यावेळी “चौक”या मराठी चित्रपटाची टीम, दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अभिनेते किरण गायकवाड, रमेश परदेशी, शुभंकर एकबोटे, अक्षय टाकसाळे उपस्थित होते.
मालिकावीर : जॅक्सन
सामनावीर : अॅडी सोमेडीने
संदेश कासार ; बेस्ट फॉरवर्ड
रोहीत देसाई : बेस्ट हाफ
प्रतिक बदामे : बेस्ट डिफेन्स
मयुरेश चौगुले : बेस्ट गोलकीपर
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आशिष पवार, किरण अतिग्रे, संदीप पवार, रोहन शिंदे, युथ काँग्रेसचे दीपक थोरात, हेमंत घाटगे, अनिकेत सावंत, कपिल मोहिते, श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, नंदू साळोखे, रणजीत साळोखे, संतोष राऊत, आनंदा महेकर, सागर शिंदे, शिरीष पाटील, बॉबी राऊत, उमेश साळोखे, विवेक साळोखे, अभिजीत गायकवाड, अजिंक्य साळोखे, युवराज पाटील यांनी नियोजन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!