दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :–महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय आणि निष्ठावंत सेवेबद्दल प्रदान करण्यात आलेल्या अति उत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक २०२६ १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दल, सांगली जिल्हा पोलिस दलातील विटा पोलीस ठाणे येथे कर्तव्यदक्ष कामगिरी करणारे तसेच दिवस रात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष कामगिरी करणारे पोलीस दलातील पोलीस अंमलदार श्री आनंदराव रंगराव पाटील, यांनी अत्यंत पोलीस दलात कर्तव्यदक्ष कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलासह सांगली जिल्हा आणि विटा पोलीस ठाण्यात आपला मान सन्मान पोलीस दलाचा मान सन्मान राखत आपली निकर्तव्यदक्ष कामगिरी केली, कर्तव्य, निष्ठा आणि समर्पणाला मिळालेला सन्मान हा माझ्यासाठी अनमोल आहे असे व्यक्तिमत्व पोलीस अंमलदार या पदवीनंतर एक चांगली जबाबदारी कर्तव्यदक्ष कामगिरी म्हणून विटा पोलीस ठाण्यात आता श्री आनंदराव रंगराव पाटील,( विटा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) पदावर कार्यरत आहेत,यांनाच सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यालय येथे सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या हस्ते अति उत्कृष्ट सेवा पदक सन्मानित करण्यात आली तो सन्मान स्वीकारून पाटील यांना बहुमान मिळाला,या वेळी पाटील हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक पदक नसून प्रामाणिक सेवा कर्तव्यनिष्ठ आणि वर्षाच्या समर्पणाची पावती आहे, अनेकांचा आशीर्वाद मला लाभला प्रेरणा मिळाली ऊर्जा मिळाली, यांचाच हा सन्मान आहे, हा सन्मान गौरव सोहळा मोठ्या वस्ताद पार पडला व त्यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी विटा उपविभागिय पोलीस अधिकारी शेलार साहेब सह विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सह विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार व पोलीस कर्मचारी तसेच गृह रक्षक दल जवानांनी त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार सन्मानित करण्यात आला, या आनंद वातावरणात श्री आनंदराव रंगराव पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
