दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
चांदन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था, धाराशिव यांच्या आयोजनातून तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी व रेणुका ब्लड सेंटर, धाराशिव यांच्या संयुक्त सहकार्याने येडशी टोलनाका येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात टोलनाका कर्मचारी, पोलीस कर्मचारी, स्थानिक व्यावसायिक, कामगार आणि महामार्गावरील वाहनचालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
७९ रुग्णांची तपासणी; ८ नवीन बीपी-शुगरचे रुग्ण आढळले
या सामाजिक उपक्रमात एकूण ७९ नागरिकांची व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान उच्च रक्तदाब (BP) आणि मधुमेह (Sugar) यांचे ८ नवीन रुग्ण आढळून आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता मोरे व डॉ. विलास तोडकर यांनी तात्काळ या रुग्णांवर औषधोपचार सुरू करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला.
५७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त दान; प्रमाणपत्राने सत्कार
आरोग्य तपासणीसोबतच आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा व कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सहकार्य व नियोजन
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे भुषण गंगावणे, आश्विजीत सोनवणे, स्वप्निल घोडेराव, मयुर गंगावणे, शाम इंगळे आणि महेश चंदनशिवे यांनी परिसरातील नागरिक व कामगारांना आरोग्य तपासणीसाठी प्रवृत्त केले. सदरील शिबिराचे उत्कृष्ट आयोजन संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गंगावणे यांनी केले होते.
या शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता शिंदे, डॉ. विलास तोडकर, आरोग्य सहाय्यक सुनील कदम, सोहल कुरेशी, आरोग्य सेवक युवराज चौगुले, साहेबराव राठोड, शिंदे सिस्टर, लॅब तंत्रज्ञ मौदाड तसेच रेणुका ब्लड बँकेचे संजय शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच टोलनाका मॅनेजर जोतीराम महादेव भोसले, पोलीस निरीक्षक नारायण लिंगाजी डप्पडवाड, सीटीसी हेमंत राठोडकर, पोलीस कर्मचारी कोळी, किशोर मनोज भिसे, सुधीर भातलवंडे, राजकुमार वाघमारे, अमर माळी आणि प्रशांत म्हेत्रे यांनी उपस्थित राहून शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.
चांदन बहुउद्देशीय संस्थेच्या या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे
