दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर आज, रविवारी (दि. १६) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात गारगोटी तसेच शिवाजी विद्यापीठातील विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
दौरा कार्यक्रमानुसार सकाळी ९ वाजता गारगोटी, ता. भुदरगड येथील निवासस्थानी ते भेटीसाठी राखीव राहणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता गारगोटी येथील निवासस्थानातून शासकीय वाहनाने ते कोल्हापूरकडे प्रयाण करतील.
सकाळी १०.४० वाजता शिवाजी विद्यापीठातील दीक्षांत समारंभ सभागृहात त्यांचे आगमन होणार आहे. याठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रथम स्थापना दिनाच्या वर्धापनदिन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती दौरा कार्यक्रमात देण्यात आली आहे.
कार्यक्रमानंतर पालकमंत्री आबिटकर गारगोटी येथील निवासस्थानी परतणार असून, तेथे त्यांचे आगमन, राखीव कार्यक्रम व मुक्काम होणार आहे.
