दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत नामे-आरती धिरज पवार, वय 26 वर्षे, रा.येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.01.11.2022 रोजी ते दि.13.08.2026 रोजी 07.15 वा. सु. राहते घरी येडशी येथे गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-धिरज श्यामसुंदर पवार, आशा श्यामसुंदर पवार, श्यामसुंदर उर्फ पोपट पवार सर्व रा. येडशी ता.जि. धाराशिव यांनी मयत आरती हिस माहेरहुन गाडी घेण्यासाठी व धंदा टाकण्यासाठी पैसे घेवुन ये असे म्हणून तिस शिवीगाळ करन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तिला वारंवार जिवे मारण्याची धमकी देवुन तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने त्याचे त्रासाला कंटाळुन मयत आरती यानी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आशा बाळासाहेब कदम, वय 40 वर्षे, रा. नारी ता. बाशी जि. सोलापूर यांनी दि.14.08.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108,85, 351(1), 351(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
