
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल, सी.बी.एस.सी.मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण हे प्रमुख पाहुणे मा. श्री.डॉ.अलोक नरदे, प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ, विटा तसेच मा. श्री.सलीम तांबोळी,संस्थेचे खजिनदार यांच्या शुभहस्ते झाले. नंतर विद्यार्थ्यांनी सुंदर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना आणि ध्वजाला मानवंदना दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य मा.श्री. अवधूत खरात यांनी केले तसेच प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका सौ. रजनी तळेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पालकांचा, शिक्षकांचा आदर ठेवा तसेच मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा घ्या आणि ‘शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्या’ असे आवाहन केले. तर प्रशालेचे प्राचार्य अवधूत खरात यांनी विद्यार्थ्यांना आपल्या स्वातंत्र्यसेनानींचे त्याग, शौर्य आणि पराक्रम विसरता कामा नये, तसेच आपल्याला मिळालेल्या मुलभूत हक्क आणि अधिकार यांचा वापर संविधानांना अनुसरून असावा आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे काळजीपूर्वक रक्षण करावे हे देखील त्यांनी आवाहन केले. उपप्राचार्य मा. श्री. निलेश भोसले यांनी देश प्रथम असा नारा दिला तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर रहा असे आवाहन केले नंतर शाळेतल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते सादर करून उपस्थितांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.
प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका सौ. रोहिणी लेंगरे यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल मनोगत व्यक्त केले. यानंतर शाळेतील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते आणि नृत्य सादर करून कार्यक्रमाचा आनंद द्विगणित केला. देशभक्तीपर गीतातून आणि नृत्यातून कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. या विशेष प्रसंगी माजी सैनिक मा.श्री.सुभेदार बालाजी मोहिते आणि हवालदार मा. श्री. दादासो सूर्यवंशी यांना देखील विशेष सन्मानित करण्यात आले.
या स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सदाशिवरावभाऊ पाटील तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. वैभव दादा पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हा सर्व कार्यक्रम संस्थेचे कार्यकारी संचालक मा. श्री. पी. टी. पाटील सर, प्रशालेचे प्राचार्य मा श्री अवधूत खरात, उपप्राचार्य मा. श्री. निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तसेच कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. राजश्री चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. रजनी तळेकर,क्रीडा विभाग प्रमुख वैभव सदामते, कलाविभाग प्रमुख प्रमोद दिवाणजी यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.सुजाता गुरव यांनी केले तर आभार श्वेता सदामते यांनी केले.
