दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
मानवी वाहतुक शाखा : पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतुक शाखेचे पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 14.08.2026 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, वाशी हद्दीतील पृथ्वीराज लॉज येथे हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर 21.50 छापा टाकला असता लॉज मध्ये पारगाव येथे आठ महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता आरोपी नामे- श्रीपती उत्तमराव घुले, वय 62 वर्षे, रा. पारगाव, अविनाश तेजाप्पा शेट्टी, वय 38 वर्षे, रा. मेंगलोर कर्नाटक, सोहेल लियाकत शेख, रा. कोपरखैरने नवी मुंबई यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने नमुद आरोपींना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन 1, सिसीटीव्ही डीव्हीआर मॉडेल नं टीटी 630805 एमपी काळ्या पांढऱ्या रंगाचे कव्हर असलेले व रोख रक्कम 22,950 असा एकुण 29,950 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन आरोपी नामे- श्रीपती उत्तमराव घुले, वय 62 वर्षे, रा. पारगाव, अविनाश तेजाप्पा शेट्टी, वय 38 वर्षे, रा. मेंगलोर कर्नाटक, सोहेल लियाकत शेख, रा. कोपरखैरने नवी मुंबई यांचेविरुध्द गुरनं 295/2026 बी.एन.एस सह 143, 144, 3 (5) सह कलम 3, 4, 5 मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम अन्वये वाशी पोलीस ठाण्यात दि. 15.08.2026 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती मारकड, पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, श्री. शेळके, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, मपोह/889 गिरी, मपोह/1463 जाधव, पोना/1176 माने मानवी वाहतुक शाखा यांच्या पथकाने केली.
