महाराष्ट्रराजकीय

सांगली पॅरामोटर नावाच्या हवेतील साहसी खेळाचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

सांगली

सांगली ( प्रतिनिधी )- :  प्लाय एन जाय स्पोर्ट्स क्लबने सुरू केलेला पॅरामोटरिंग मधून सफर करणे म्हणजे हेलिकॉप्टर मधून सफर करण्याचा आनंद मिळतो असून सांगली जिल्हा परिसरातील आबालवृद्धांनी त्याचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केले.
फ्लाय एन जाय स्पोर्ट्स क्लबच्या पॅरामोटरिंग नावाच्या हवेतील साहसी खेळाचा शुभारंभ सांगलीचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते एनमधामनी येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते
पॅरामोटरिंग मधून हवाई सफर उपलब्ध करून देणारा उपक्रम पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच  असून सांगली जवळच्या सांगली जवळच्या इनामधामणी गावांत ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉलच्या मागे असलेल्या विस्तीर्ण हेलीपॅडवर हा  उपक्रम सुरू करण्यात आला आहे.सांगलीकर नागरिकांसह आसपासच्या नागरिकांना सहकुटुंब याचा आनंद घेता येणार आहे.पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी स्वतः पॅरामोटरी मध्ये बसून सांगलीची हवाई सफर केली. गेल्या दोन महिन्यांपासून त्याची चाचणी करण्यात येत होती शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची सुरुवात झाली.  उदघाटन पार पडल्यानंतर अनेकांनी पॅरामोटरिंग मध्ये बसून आकाशात विहार करण्याचा आनंद लुटला.लहान मुलांनीही हवाई सफर केली.प्रारंभी पॅरामोटरिंगचे पूजन पालकमत्र्यांच्या सौभाग्यवती   सुमनताई खाडे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी श्रीपळ वाढवुन आणि फित कापून  त्याचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना पालकमंत्री खाडे पुढे म्हणाले की, हा उपक्रम सांगलीच्या वैभवात भर घालणारा आहे.पर्यटनाच्या दृष्टीने उपयोगी असून कुटूंबासह यांचा आनंद लुटण्याची संधी या क्लबने उपलब्ध करून दिली असल्याचे सांगत महापुरासारख्या नैसर्गिक आपत्ती मध्येही मदत कार्य पोहोचविण्यासाठी याचा उपयोग होणार असून शासनाला ते उपयोगी पडणार असल्याचही  सांगितले. हे पॅरामोटर म्हणजे एक छोटं हेलिकॉप्टर असल्याचं मतही पालकमंत्री खडे यांनी व्यक्त केलं.प्रारंभी पालकमंत्री खाडे यांचे स्वागत डॉ मिलींद किल्लेदार यांनी केले.पॅरामोटरिंग मध्ये बसून आकाशातली  हवाई सफर करत  आनंद पालकमंत्री खाडे यांनी.मोटरिंगच्या पायलटचे कौशल्याचेही त्यांनी कौतुक केले. पालकमंत्री खाडे यांनी रिक्षा चालवण्याचा आनंद कालच लुटला होता.आज त्यांनी हवाई सफर करून सांगलीच्या विश्रामबाग परिसर पाहिला. त्यांनी सहकुटुंब हजेरी लावली.लावत हवाई सफरीचा आनंद लुटला.माधव बेटगीरी यांनी यावेळी सांगितलं की,वृद्ध लोकांना देखील सुरक्षित पणे पॅरामोटरिंग करता येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचं सांगितलं.सौ किल्लेदार यांनी तीन अनुभवी पायलट सोबत पॅरामोटरिंग करता येणार असून आकाशात विहार करण्याची विश्वसनिय संधी उपलब्ध झालाचं म्हटलं, तर सौ विद्या बेटगिरी यांनी चार पाच महिन्याच्या अभ्यासानंतर हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय डॉ मिलींद किल्लेदार आणि माधव बेटगिरी यांनी घेतल्याचं सांगितलं. उदघाटनाच्या प्रारंभी अनेक नागरिक महिला,तसेच लहान मुलांनी आकाशात हवाई सफर करण्याचा आनंद लुटत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!