दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :–
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: दि.04.08.2026 रोजी 19.30 वा. सु.जहागिरदारवाडी शिवारातील शेत गट नं 75 मध्ये अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी 08.325 किलो ग्रॅम एकुण 1,66,500₹ किंमतीचा कॅनाबिस वनस्पती या एका रोपाची लागवड केलेली धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द गुंगीकार औषधीद्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम 8(ब), 20(अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
